इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेच्या माध्यम समन्वयासंदर्भात बैठक

नागपूर :- भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यम समन्वयासंदर्भात आढावा बैठक नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी.एस. खाडेकर, राजेश सिंग, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, नागपूर विद्यापीठाच्या माध्यम विभागाचे प्रमुख मोईज मन्नान हक हे यावेळी उपस्थित होते.

1914 मध्ये भारतात विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोलकत्ता येथे पहिल्या भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हे आयोजन भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे घेतले जाते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा उत्साहात

Sat Dec 3 , 2022
नागपूर :- समाज कल्याण विभागाअंतर्गत 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 01 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात अनुसूचित जाती स्वयंसहायता युवा गट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेत एकूण 23 युवागटातील 114 लोक उपस्थित होते. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. बार्टीतर्फे हायटेक आणि ईडीपीच्या यशस्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com