संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी कामठी तालुक्यातील गादा येथे सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेल्या जीवन तरंग बहु. सेवा संस्था कामठी तर्फे, दिवाळी स्नेह मिलन व तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील सन्मान समारोह आयोजीत करण्यात आला होता.
रक्तदान शिबिर, महिला सबलीकरण, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण आदी उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेचे तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वज्ञात झाले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी, जीवन तरंग संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर गावातील बाल कलाकारांनी अनेक मनमोहक नृत्य सादर करून कार्यक्रमाला जमलेल्या मोठ्या संख्येतील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात नुकतेच नवनियुक्त झालेल्या पोलीस पाटलांचा तसेच विविध कार्यक्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचा उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्या व इतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रेमलता दीदी, उमेश मस्के अध्यक्ष जिवन तरंग, अनिल निधान, सरपंच सचिन डांगे, उपसरपंच मोहन मारबते, बळवंतराव रडके, खुशाल येवले, मधुकर ठाकरे, वसंतराव ठाकरे, नंदू बोरकर, रूपाली वंजारी, भूषण वानखेडे, गणेश नाकतोडे, मधुकर ठाकरे शेषराव दवंडे, मनोज मेश्राम, स्वप्निल मेश्राम, मनोहर भोयर,राहुल खुरपडी, होमराज गोरले, भिमराव भोरे, गजेंद्र वाट, राहुल शेळके, पराग सपाटे, कृष्णा दवंडे, कामरान, पंकज नलेंद्रवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना चकोले, लीलाधर दवंडे, हरीश रोहनकर यांनी प्रयत्न केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन घनशाम मामा चकोले यांनी केले.