नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची सभा नागपूर महानगरपालिका तर्फे सोमवारी 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. या प्रसंगी शहरातील सर्व सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या राष्ट्रभक्ती अभियानात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.