संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
सावनेर :- दिनांक १२/७/२०२३ ला मंडळ ऑल इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा गुडधे यांच्या सावनेर येथे शाही मंदिर जवळ निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीला लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले प्रामुख्याने उपस्थित होते.
सोबत राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता बोपचे, महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबाराव दुपारे, राष्ट्रीय सदस्य निशा खडसे, चित्रा गुडधे, प्रेमीला वाकोडे, मुसळे, अरुणा डाहाके, वर्षा चिखले, ज्ञानेश्वर गावंडे, वासुदेव वाकोडे, केचे, चौधरी व अनेक मान्यवर पुरुष आणि महिला कलावंतांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहीले.