सफाई कामगारांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा – डॉ.विपीन इटनकर

Ø मनपाच्या संबंधित विषयांवर आज बैठक घेण्याच्या सूचना

नागपूर :- सफाई कामगारांच्या विविध मागण्यांचे विषय तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. महानगर पालिकेसंबंधित सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज ६ फेब्रुवारी २०२४ रोजी बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

येत्या ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कामगारांच्या विविध विषयांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे, तत्पूर्वी डॉ.इटनकर यांनी या विषयांसंदर्भात आढावा घेतला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेसिनी तेलगोटे, मनपा उपायुक्त गजेंद्र महल्ले, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) विजय माहुसकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर, कामगार कल्याण विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

सफाई कामगारांना सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारे विविध लाभ, जातपडताळणी कार्यालयात प्रलंबित असणारे सफाई कामगारांचे प्रकरणे अशा एकूण १३ विषयांवर यावेळी चर्चा झाली. या विषयांबाबत डॉ.इटनकर यांनी सद्य: परिस्थिती जाणून घेतली तसेच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सफाई कामगारांच्या संबंधित मागण्या तातडीने पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे निर्देश दिले.

कोविड महामारीच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या महानगर पालिकेच्या सफाई कामगारांना द्यावयाची मदत, मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबातील व्यक्तींना लाड पागे समितीच्या निर्देशानुसार नोकरी देणे, सफाई कामगारांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करणे आणि महा दलित महासंघाने निर्देशित केलेले मनपात कार्यरत अनुभव नसणारे व पारंपरिक कामे करणाऱ्या सफाई कामगारांबाबतचे विषय मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून निकाली काढण्याचे निर्देशही डॉ.इटनकर यांनी बैठकीत दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

DRDO ने साधी चुप्पी? राजनैतिक दबावतंत्र ने जकड़ रखे कलम?

Mon Feb 5 , 2024
पुणे में एयरफोर्स ‘एक्शन मोड’ में – नागपुर- रक्षा मंत्रालय के रक्षा प्रतिष्ठानों भू-गिर्द निर्माणकार्य के लिए सख्त नियम-कानून कायदे हैं. एक बड़े विकास में, रक्षा मंत्रालय ने रक्षा प्रतिष्ठानों के 500 मीटर के भीतर स्थित निर्माणों पर प्रतिबंध हटा दिया है और स्पष्ट किया है कि केवल अत्यधिक संवेदनशील प्रतिष्ठानों के 50 मीटर के भीतर निर्माण के लिए स्थानीय सैन्य कमांडर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com