वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पातून ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ची पुन्हा प्रचिती माहूल व महालक्ष्मी स्थित प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे गौरवोद्गार

–    वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका 

–   माहूल येथे प्रतिदिन १५ मेट्रिक टन प्राणवायू वापरुन १५०० जंबो सिलेंडर्स भरणे शक्य,

–    भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने प्रकल्प उभारणी

–    महालक्ष्मी प्रकल्पामध्ये प्रतिदिन १०० ते १२० ड्युरा सिलेंडर्स भरण्याची क्षमता

–    स्वतःच्या प्रकल्पांमुळे सिलेंडर पुनर्भरणाच्या खर्चात होणार ४० टक्के बचतवाहतुकीचा वेळही वाचणार

 

            मुंबई : कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱया स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहेअसे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरणपर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्यानेएम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायूरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दिनांक १७ जानेवारी २०२२) झालेत्याप्रसंगी ते बोलत होते.

            कोविड संसर्ग स्थितीमुळे ऑनलाईन स्वरुपात आयोजित या समारंभास मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकरखासदार श्री. अरविंद सावंतखासदार श्री. राहूल शेवाळेमहानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहलअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासूबीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) श्री. एन. चंद्रशेखरजी दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकरएम पश्चिम विभागातील नगरसेवक  श्री. श्रीकांत शेटयेनगरसेवक अनिल पाटणकरनगरसेविका श्रीमती अंजली नाईकतसेच महानगरपालिका उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण) श्री. रमाकांत बिरादारउप आयुक्त (परिमंडळ ५) श्री. विश्वास शंकरवारसहायक आयुक्त सर्वश्री. विश्वास मोटेशरद उघडेपृथ्वीराज चौहाणप्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) श्री. कृष्णा पेरेकरसंबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले कीकोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागलेइतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोगहातांची स्वच्छतासुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहेअसे आवाहनही श्री. ठाकरे यांनी अखेरीस केले. दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल श्री. ठाकरे यांनी महापौरसर्व लोकप्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.

             मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर संबोधित करताना म्हणाल्या कीमाहूल व महालक्ष्मी येथील ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट हे जणू संजीवनी प्रकल्प आहेत. कोविडच्या दुसऱया लाटेत मुंबई व महाराष्ट्राबाहेर प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णांना यातना सहन कराव्या लागल्यामात्र त्याही स्थितीत मुंबईने योग्य दक्षता व नियोजन याआधारे रुग्णांचे प्राण वाचवले. आता ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांटमुळे पैसा आणि वेळही वाचणार आहे. ही सर्व कामगिरी इतर शहर व राज्यांनाही दिशा देणारी आहे. आपल्या प्रकल्पांमधून वेळप्रसंगी इतरांनाही मदत करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कामगिरीची देशपातळीवर वाखाणणी केली जातेअसे सांगून मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक निर्देशांचे पालन करावे आणि प्राणवायू पुरवठ्याची चिंता करु नयेअसेही महापौरांनी नमूद केले.

            खासदार श्री. अरविंद सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले कीया दोन्ही प्रकल्पांतून वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने कोविड इतर (नॉन कोविड) प्राणवायूची बचत होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. महापौर व महानगरपालिका आयुक्तांची टीम ही सर्वोत्कृष्ट कार्य करीत आहे. प्रत्येक निर्णय घेताना दूरदृष्टीने कामकाज केले जात असून मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदय देखील त्यावर लक्ष केंद्रीत करत असतातअसा उल्लेखही श्री. सावंत यांनी केला.

            खासदार श्री. राहूल शेवाळे मनोगतात म्हणाले कीदेशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरपालिका अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. कोविड व्यवस्थापनामध्ये धारावी मॉडेल पाठोपाठ ऑक्सिजन मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचे कामकाज महानगरपालिकेने केले आहे. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. माझ्या मतदारसंघातील बीपीसीएलआरसीएफएचपीसीएलइंडियन ऑईल अशा सर्वच कंपन्यांनी कोविड व्यवस्थापन व प्राणवायू पुरवठ्यासाठी मोठी मदत केली आहेअसा कृतज्ञतापूर्वक उल्लेखही श्री. शेवाळे यांनी केला.

            महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल याप्रसंगी म्हणाले कीकोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगीमहानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आपण वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू निर्मिती’ करणारे प्रकल्प (पीएसए प्लांट) उभारले. मुंबईत सध्या १८६ कोविड रुग्णालये असून आपत्कालीन प्रसंगी एका रुग्णालयातून इतर रुग्णालयांना प्राणवायू मदत पाठविण्यासाठी विविध मर्यादा येतात. माहूल व महालक्ष्मी येथील प्राणवायू प्रकल्पांमध्ये साठवण व पुनर्भरण अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे मुंबईतील १८६ रुग्णालयांमध्ये कधीहीकोठेही प्राणवायू पोहोचविण्यास मोठा हातभार लागणार आहे. कोविडची साथ शिखरावर असताना दिवसाला २०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सची गरज भासत होती. आता एकट्या महालक्ष्मी प्रकल्पामधूनच १०० ते १२० ड्युरा सिलेंडर भरणे शक्य होणार आहेयातून महानगरपालिकेने साध्य केलेली क्षमता सिद्ध होतेअसे डॉ. चहल यांनी नमूद केले.

            अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी संगणकीय सादरीकरणासह प्रास्ताविक केले. ते म्हणाले कीकोविडच्या दुसऱया लाटेत प्राणवायू पुरवठा समस्येवर योग्य नियोजनाने आपण मात केली. असे असले तरी त्यातून बोध घेत ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट उभारले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्राणवायूचा साठा करण्यासह ऑक्सिजन सिलेंडर्सचे योग्य वितरण करणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱयांनी दिवसरात्र धावपळ करुन आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्याअवघ्या ३ ते ४ महिने कालावधीत प्रकल्प उभारलेमाहूलमधील कामांसाठी बीपीसीएलचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य मिळालेयाचा उल्लेख करीत महापौरसर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या योग्य समन्वयातून हे घडून आलेअसेही श्री. वेलरासू यांनी नमूद केले.

                    बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) श्री. एन. चंद्रशेखर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. श्रीमती स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

5 नगरपंचायती मधील उर्वरीत 11 जागांसाठी 85.38 टक्के मतदान

Tue Jan 18 , 2022
-सतीश कुमार संवाददाता ,गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.18: जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा, व कुरखेडा नगर पंचायतीच्या निवडणुकीकरीता सरासरी 85.38 टक्के मतदान झाले. यात अहेरी नगरपंचायतीकरीता 649 मतदारांनी (स्त्री – 320, पुरुष – 329 मतदार, एकूण टक्केवारी 80.82 ), सिरोंचा नगर पंचायतीकरीता 900 मतदारांनी (स्त्री – 475, पुरुष – 425 मतदार, एकूण टक्केवारी 81.23 ), चामोर्शी येथे 2375 मतदारांनी (स्त्री – 1178, पुरुष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!