मुंबई :- हिंगोली येथील प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल रोडगे यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्या समर्थकांसह शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. रोडगे यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी , माजी आमदार गजानन घुगे आदी उपस्थित होते.
हिंगोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोडगे यांचा भाजपा मध्ये प्रवेश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com