नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत, रहमानीया मस्जीद जवळ, महेंद्र नगर, पाचपावली, नागपूर येथे काही ईसम एम.डी. पावडर खरेदी-विक्री करीता येणार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन पंचासमक्ष आरोपी १) अझरुद्दीन खीमुद्दीन काझी, वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं. १६, पर नं. ६५५, महेंद्र नगर, पाचपावली, नागपुर २) ईरफान शब्बीर अहमद, वय २१ वर्षे, रा. टिमकी, मोमीनपुरा, तहसिल, नागपुर ३) नदिम खान नसिम खान, वय २४ वर्षे, रा. शांतीनगर घाट जवळ, नागपुर ४) सय्यद सोहेल अली उर्फ शोबु, वय २५ वर्षे, रा. नवि वस्ती, टेका, नागपुर यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळुन एकुण ३०६ ग्रॅम एम.डी. पावडर किंमती ३०,६०,०००/-रु. ची मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी. पावडर, तिन मोबाईल फोन, एक स्प्लेंडर मोटारसायकल, वजन काटा व पाऊच असा एकुण ३१,८०,५१०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे त्यांचे साथीदार पाहीजे आरोपी नामे १) जुबेर अफसर शेख, य. शिवडी, मुंबई २) सानु सलामुद्दीन काझी, रा. हैदरपुरा, अमरावती, ह.मु. शांतीनगर, नागपुर ३) शेख अतीक, रा. शांतीनगर भाट जवळ, नागपुर यांचे मदतीने अवैध अंमली पदार्थ खरेदी, विकी करीत असल्याचे सांगीतले. आरोपींचे कृत्य हे कलम ८ (क), २२(क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरुध्द पोलीस ठाणे पाचपावली येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव पाचपावली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पौनि गजानन गुल्हाने, सपोनि मनोज पुरडे, सफौ. सिध्दार्थ पाटील, पौहवा. विवेक अढाऊ, मनोज नेवारे, सुरज भानावत, शैलेष दोबोले, नापोअं. पवन गजभिये, राशिद शेख, पोअं रोहीत काळे, सहदेव चिखले, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर व मपोहवा अनुप यादव यांनी केली.