दवलामेटी ग्राम पंचायत सदस्याना अपात्र करा गकऱ्यांची मागणी

– जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन सादर.

दवलामेटी :-ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सदस्यानं वर काहीना काही कारना वरून अपात्र होण्याची कार्यवाही होताना आपण पाहिले आहे. परंतू गावातली नागरिकांनीच लोकं प्रतिनिधींची तक्रार जिल्हा अधिकारी साहेबांना करण्याचा प्रकार दवलामेटी ग्रामपंचायत येथे नुकतंच घडले आहे.

दवलामेटी ग्राम पंचायत चे सदस्य यांना खालील कारणावरून चौकशी करून त्वरित अपात्र घोशीत करण्यात यावे अशी लेखी निवेदन देऊन दवलामेटी परिसरातील नागरिकांनी जिल्हा अधिकारी विपीन इटनकर यांना विनंती केली.

साधना छत्रपति शेंद्रे, रा. दवलामेटी हेटी, वॉर्ड क्रमांक २. यांना तीन आपत्य असुन यांचा वर फौजदारी गुन्हा नोंद करून त्वरित अपात्र घोषीत करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत सदस्य गजानन रामेकर, सतीश खोब्रागडे, छाया खिल्लारे, रश्मी पाटिल, शितल वानखेडे यांनी घरटॅक्स मागणी बीलाचा तरखे नंतर , म्हणजे ९० दिवसाचा आत घर टॅक्स भरले नाही तरी या सदस्यांनची चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर प्रक्रिया करून त्वरित या हि सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाहि करावी आणि सोबतच अतिक्रमणं करून राहत असल्याने शकुंतला अभ्यंकर, अर्चना चौधरी यांची पण योग्य चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य पदावरून त्वरीत अपात्र करण्या ची विनंती यावेळी गावकऱ्यांनी केली.

विपीन इटनकर जिल्हा अधिकारी नागपूर :- 

या मागणी अर्जातील काही सदस्यां वर आधीच अपर जिल्हाधिकारी यांचा कोर्टात अपील सुरू असून त्यांचा निर्णयाची वाट बघावी असे नागरीकांना जिल्हा अधिकारी याांनी चर्चे दरम्यान सांगीतले.

यावेळी दवलामेटी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com