एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेडन्यूज वर ही बारकाईने लक्ष ठेवावे -जिल्हाधिकारी

भंडारा दि. 14 : जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याबरोबरच मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमात  उमेदवार  व राजकीय  पक्षाबाबत आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेख आदी मजकूराची तपासणी करुन त्यातील पेडन्यूजवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिले.

       जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अंतर्गत आचारसंहिता लागू झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पेड न्यूज नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी असून समितीमध्ये सायबर सेलचे प्रतिनिधी, संबंधित तहसीलदार तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, संबंधित प्रभागाचे, मतदार विभागाचे, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील आणि ज्येष्ठ नागरिक व वरिष्ठ पत्रकार म्हणून रमेश सुपारे कार्यरत आहेत. आज या समितीची बैठक झाली.

            तत्पूर्वी राज्य निवडणूक आयोगाने 26 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी पेड न्यूज बाबत करावयाच्या कार्यप्रणालीची माहिती दिली होती.

       निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांवर प्रसिध्द करण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहिरातीचे प्रमाणीकरण करुन द्यावे. त्याप्रमाणेच मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीच्या स्वरुपातील  व मोबदला देऊन प्रसिध्द केलेल्या बातम्यांची तपासणी करुन संशयित पेड न्यूज वर बारकाईने लक्ष ठेवावे. व त्या पेडन्यूज असल्याचे आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सिध्द होत असेल तर संबंधित उमेदवारांना नोटीस देण्याबरोबरच पेड न्यूज  वरील तो खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात नोंद करण्याबाबत निवडणूक खर्च समितीला कळविले पाहीजे, असे श्री. कदम यांनी आज बैठकीत सूचित केले.

       प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रसारमाध्यमांतून प्रचार, प्रसिध्दी करण्यासाठी जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण घेणे  अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रसारमाध्यमांनीही राजकीय, पक्ष व उमेदवारांच्या प्रसिध्दीसाठी आलेल्या जाहिराती  एमसीएमसी समितीकडून प्रसारणाचे प्रमाणपत्र मिळाल्याची खात्री करावी व त्यानंतरच जाहिराती प्रसिध्द कराव्यात व निवडणूक विभागाला निर्भिड, मुक्त व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी सहकार्य करावे.

       प्रारंभी माध्यम प्रमाणीकरण समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी एमसीएमसी  समितीच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच या समितीचे काम जिल्हा माहिती कार्यालयातून होणार आहे.

पेड न्युज म्हणजे काय ?

काही उमेदवार, राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये वर्तमान पत्रातील बातम्यांच्या स्वरुपात आपली जाहिरात करतात. या जाहिरातीचे दृश्य स्वरुप जरी बातमी स्वरुपाचे असले तरीही प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांना किंमत देऊन अशा बातम्या छापुन आणल्या जातात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

निवडणुकीमुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडीला 20 व 21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

Wed Dec 15 , 2021
भंडारा : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निश्चित केलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व मतदान साहित्यासह मतदान पथके 20 डिसेंबर रोजी पोहोचतील. दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच नंतर रात्री उशिरापर्यंत सर्व साहित्यासह परत येणार आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण हे शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com