संदीप बलविर, प्रतिनिधी
चिमुकल्यांच्या नृत्यात श्रोते मंत्रमुग्ध
महाप्रज्ञा बुद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचा उपक्रम
टाकळघाट :- महाप्रज्ञा बुद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच,टाकळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने युगसूर्याची सावली,त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाप्रज्ञा बुद्ध विहार,टाकळघाट येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संदीप बलविर तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा प सरपंच शारदा शिंगारे, प्रतिभा भगत,लता बहादूरे, राजू म्हैसकर, चिंधु मुन इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी लहान लहान चिमुकल्यांनी रामाईच्या जीवनावर आधारित गीतांवर सुंदर नृत्य सादर केले.
माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सरपंच शारदा शिंगारे यांनी रामाईचा त्याग आम्हाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरान सारखे महापुरुष देऊन गेला त्याची परतफेड करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर पत्रकार संदीप बलविर यांनी समाजात चांगले अधिकारी घडविण्यासाठी स्त्रियांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल कांबळे, प्रास्ताविक श्रद्धा वासनिक तर आभार सेजल पाटील यांनी केले.