ईपीएस 95 पेन्शनर्सचा 27 डिसेंबरला मोर्चा

नागपूर :- ईपीएस 95 योजनेखाली मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनचा निषेध म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी मंगळवार, 27 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चाने धडकणार आहेत. ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांच्या संयुक्त वतीने हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून दुपारी 1 वाजता निघेल. पेन्शनवाढीसाठी महाराष्ट्र सरकारने केन्द्र सरकारवर दबाव आणावा, या मागणीचे निवेदन मोर्चातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे. सेवानिवृत्तांनी या मोर्चात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीचे प्रकाश येंडे, प्रकाश पाठक, दादा झोडे, श्याम देशमुख, पत्रकार संघाचे शिरीष बोरकर, ज्येष्ठ महामंडळाचे अॅड. अविनाश तेलंग आदींनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परसबाग शेळी विकास योजने करिता अर्ज आमंत्रीत

Thu Dec 22 , 2022
भंडारा : शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानातर्गंत अहिल्या शेळी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे 10 ते 25 डिसेंबर 2022 पर्यत मागविण्यात येत आहे. अहिल्या शेळी योजनेतर्गंत जिल्ह्यातील 18 ते 60 वर्षामधील अनुसूचित जाती/जमाती, दारिद्र्य रेषेखालील अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महिला अर्जदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com