संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने काढण्यात येणारी मारबत निवडणूक यावर्षी सुद्धा तान्हा पोळ्याला कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहात मारबत मिरवणूक काढण्यात आली.
Video Player
00:00
00:00
समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याचे आवाहन करणारी ही मिरवणूक आज 27 ऑगस्ट ला तान्हा पोळ्याला काढण्यात आली.दरम्यान सकाळपासूनच ईडा पीडा टाळो..बळीराजा चे राज्य येवो या घोषणेसह घेऊन जा गे मारबत चा स्वर गुंजला..तसेच , भ्रष्टाचार, दहशतवाद, शहरातील समस्या आदी विषयांवर बडगे काढून या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका करण्यात आली.