मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साजरा होणारमराठी भाषा गौरव दिन

मुंबई :- सोमवार दि.27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (दिनांक 27 फेब्रुवारी) हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.

मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान” मुंबई येथे संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेचा प्रवास उलगडुन दाखविणारा सांगितीक कार्यक्रम “ऐसी अक्षरे रसिके” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ व भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

तसेच, यावर्षी विविध महानगरपालिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाचन प्रेरणा दिन मराठी स्पर्धेतील तीन विजेत्या महानगरपालिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे 35 पुस्तकांचे प्रकाशन या वेळी होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

Sun Feb 26 , 2023
मुंबई : महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सशक्ती डिजिटल व्हॅनचा’ शुभारंभ करण्यात आला. मास्टरकार्ड अॅण्ड लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे 7 हजार 500 महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!