मुंबईत 24 जानेवारी पर्यंत मराठी चित्रपटांचा महोत्सव, सर्वांना विनामुल्य प्रवेश

मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार पात्र विजेत्या मराठी चित्रपटांचा महोत्सव दि. 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन दि. 21 जानेवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्य विभागचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये फनरल, झिपऱ्या, एक हजाराची नोट, कासव, श्वास, धग, इन्व्हेस्टमेंट, गोष्ट एका पैठणीची हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे. त्याचप्रमाणे मराठी सिनेमा आणि ओटीटी माध्यम यावर एका परिसंवादाचे आयोजन आज, दि. 22 जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे.

या मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रकल्प संचालक संतोष रोकडे व स्नेहल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत 'राष्ट्रीय मराठी मोर्चा'ची स्थापना, भाजप नेते आनंद रेखी राष्ट्रीय अध्यक्षपदी

Mon Jan 23 , 2023
अभिनेते सचिन खेडेकर यांचे ही समर्थन नवी दिल्ली / मुंबई :- राष्ट्रीय पातळीवर मराठी मतदारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच राजधानीसह बृहन्महाराष्ट्रात मराठी बांधवांच्या सामाजिक तसेच सांस्कृतिक चळवळीनंतर राजकीय नेतृत्वाची फळी उभारण्याच्या दिशेने सर्व राज्यातील प्रमुख मराठी संघटना व मंडळानी एकत्रित येऊन देशातील पहिले मराठी राजकीय व्यासपीठ ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ स्थापन केला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत गेल्या १२ वर्षांपासून भाजप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com