नागपूर :- नागपूर महानगरपालिका प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 06.08.2024 रोजी गांधीबाग झोन क्र ०६ अंतर्गत झोन कार्यालय ते बडकस चौक ते गांधीबाग चौक ते महाल चौकापर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
• लक्ष्मीनगर झोन क्र ०१ आणि धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत झोन कार्यालय लोकमत चौक ते बजाज नगर चौक ते अभ्यंकर नगर चौक ते आयटी पार्क ते गोकुलपेठ बजार परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
• हनुमान नगर झोन क्र ०३ अंतर्गत झोन कार्यालय ते तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक ते उदयनगर चौक ते ते मार्गे नगर चौक ते हुडकेश्वर रोड परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे ठेले व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
• आशी नगर झोन क्र ०९ अंतर्गत झोन कार्यालय ते इंदोरा चौक ते कमाल चौक ते चार खंबा चौक ते राणी दुर्गावती चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
• ही कारवाई हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात, भास्कर माळवे क.अभियंता अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.