– आमदार आशिष जयस्वाल यांचा पुढाकार
रामटेक :- ‘ आमदार आपल्या दारी ‘ या मोहिमेच्या माध्यमातुन आमदार आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेत तालुक्यातील अनेक गावात समाधान शिबीरे घेऊन त्याद्वारे अनेक ग्रामस्थांची विविध कार्यालयीन कामे मार्गी लावलेली आहेत. असेच समाधान शिबीर आज दि. २८ डिसेंबर ला ग्रामपंचायत पंचाळा अंतर्गत येत असलेल्या तथा आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या गुगुलडोह येथील जि.प. शाळेमध्ये सकाळी १० ते ५ वाजतादरम्यान घेण्यात आले. याचा तब्बल १०४ लोकांनी लाभ घेतला.
दोन हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गुगुलडोह गावात आदिवासी लोकांची वस्ती आहे. तालुक्याचे रामटेक हे ठिकान येथुन लांब असल्यामुळे लहान कामांसाठी जाणे – येणे ग्रामस्थांना न परवडणारे राहाते. तेव्हा आज घेतलेल्या समाधान शिबिरात अनेक ग्रामस्थांची विविध कामे पार पडली. त्यात निराधार योजनेच्या २४, इ – श्रम कार्ड चे १०, राशन कार्ड चे ४०, नवीन मतदान कार्ड चे २०, बांधकाम मजुर कार्ड चे ८ अशा एकुण १०४ लोकांची अर्ज स्विकारण्यात आली असुन त्यांची कामे मार्गी लागली आहेत. शिबीराच्या यशश्वीतेसाठी धिरज राऊत, पिन्टु खंडाते, दिपक निरुडवार, शुभम पोटे, राजेश वानखेडे, संजय झाडे, संजय सलामे, ज्ञानदेव वाढीवे, नरेंद्र मडावी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी उपस्थीतांमध्ये सरपंच प्रगती माटे, उमसरपंच योगेश मात्रे, ग्रामविकास अधिकारी आर.जी. मानेकर, सामाजीक कार्यकर्ता संजय सलामे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.