महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव आणि आमदार जयंत पाटील यांचे निलंबन रद्द न केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला सभात्याग…

नागपूर  :- महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही शिवाय आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंगावर येवू नका अन्यथा शिंगावर घेवू - अँड.संदीप ताजने

Mon Dec 26 , 2022
कॉंग्रेस-एनसीपी प्रणित भ्याड हल्ल्याला भीक घालत नाही मुंबई / पुणे :-राज्याची उपराजधानी नागपूर येथे काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांच्यावर संघटन विरोधी काही ‘पक्षकंटकांनी’भ्याड हल्ला केला होता.या हल्ल्यानंतर पहिल्यादांच अँड.ताजने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्षात संघटनविरोधी लोकांना घुसवून कॉंग्रेसने नागपुरात माझ्यावर प्राणघात भ्याड हल्ला घडवून आणला.कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुपारीबाज दलालांचे हे काम आहे.ही षंड मंडळी बसपाचे नाव पुढे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com