प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

नागपूर :- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे बापूसाहेब काने,वाल्मिकी संघटनेचे मुंबई अध्यक्ष मोहन कंडार यांच्यासह विविध समाजातील कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. आ. अभिमन्यू पवार, आ. संजय सावकारे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक आदी यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांच्या व वाल्मिकी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक नितीन धांडे, वरणगावचे माजी नगरसेवक नितीन माळी, सोलापूर येथील श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊसंगा, वडार युवक समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ दुर्लेकर, सोलापूर महापालिका परिवहन समितीचे माजी सदस्य गणेश साळुंखे, सोमवंशीय समाजाचे संतोष बसुदे, पुणे येथील युवक कार्यकर्ते सागर दोलत्तडे, प्रवीण वाडे, सतीश खरटमल, वाल्मिकी मेहतर समाजाचे सुरेश राठी,राजू सौंदे आदींचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ORDER DETAINING NOTORIOUS GOON Jakir @Jakira Hussain Ansari S/o Abdul Kadir Ansari UNDER MPDA QUASHED BY BOMBAY HC

Wed Feb 28 , 2024
Nagpur :- Division Bench presided over Vinay Joshi and Vrushali Joshi JJ have quashed and set aside order of detention dated 4-04-2023 passed by Commissioner of Police, Nagpur thereby detaining him under sec 12 (1) of Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug offenders, Dangerous persons and Video Pirates Act, 1981. Jakir @Jakira Hussain Ansari S/o Abdul Kadir […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights