नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिका आणि मनपा बिट कव्हर करणाऱ्या पत्रकारांतर्फे गुरुवारी (ता. ६) मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षात मराठी भाषेतील आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी आणि सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चरपे, सचिव ललेंद्र करवाडे, ज्येष्ठ पत्रकार गणेश हूड, राम भाकरे, राजेश प्रायकर, डॉ. ममता खांडेकर, समीर पठाण, सागर मोहोड, प्रशुन चक्रवर्ती, पठाण, मिलिंद कीर्ती आणि जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.