मानकापुर क्रीडा संकुलाचे रूपांतर जागतिक दर्जाच्या सुविधा केंद्रात होणार – विकास ठाकरे

– धोरणात्मक आरखड्यातून पश्चिम नागपुराचा विकास

– पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांची आघाडी

नागपूर :- विकासााचा आराखडा समोर ठेवून सातत्याने पश्चिम नागपुरात गेली पाच वर्ष धोरणात्मक कामे करण्यात आली आहे. राज्याला प्रगतीपथावर नेण्याकरिता आज लोकसेवेची पंचसूत्री योजना महाविकास आघाडीला सत्तेत पाठवित आहे. शांतता, सौहार्द, विकसीत हा नागपुरकरांचा अजेंडा आहे. त्याला पुढे नेण्याचे काम पश्चिम नागपुरात काँग्रेसने केले. आता लोकसेवेची पंचसुत्री योजनांसह विकास ठाकरेंच्या जनतेचा स्वप्नपूर्तीचा वचनामा हा पश्चिम नागपुराचा चौफेर विकास करणार आहे. यात महिलांना स्वरोजगार, आधुनिक रुग्णालय, रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरन, सुसज्ज वाचनालय, सिसी फ्लोरिंग, आयब्लॉक्सची कामे, सिवर लाइनचे बांधकामे, पाण्याची समस्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक, रोजगार, शिक्षण, उद्योग या सर्व विषयांचा अभ्यासपूर्ण कामे करण्याचे संकल्प आपण करीत असल्याची माहिती पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.

जन-आशीर्वाद यात्रेत पावा बुद्ध विहाराजवळ एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, गेली पाच वर्ष आपला मतदार क्षेत्रासह शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करीत आहोत. यंदा महाविकास आघाडीकडे सत्तेच्या दिशेने पाऊल ठेवत आहे. त्यामुळे आगामी काळात आपला पश्चिम नागपुरसह शहराचे नावलौकिक करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले. प्रत्येक प्रभागात खेळाची मैदाने आणि उद्याने विकसित केली जाणार. यात योग्य वॉकिंग ट्रॅक, योग शेड, ग्रीन जिम, पिण्याच्या पाण्याची सोय, सामुदायिक हॉल, सार्वजनिक शौचालये, स्टोअर रूम आदि तयार करण्यात येणार. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे प्रलंबित क्रीडा सुविधांमूळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. त्याला सर्वोतपरी काम आपण समजून त्याचे निराकारण करणार आहोत. याशिवाय प्रत्येक प्रभागात एक इनडोअर क्रीडा स्टेडियम विकसित केले जाईल. पश्चिम नागपुरातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत आपण कटिबद्ध असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.

 नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने घेतला जन-आशीर्वाद यात्रेत सहभाग

महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात शुक्रवारी कुतूबशाह नगरातून करण्यात आलकी. सकाळी आठ वाजता कुतूबशाह नगरातील मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. यानंतर पुढे शिला नगर, दशरथ नगर, आदिवासी मोहल्ला, कमरुद्दीन लेआउट, पटेल नगर, समसुद्दीन लेआउट, बोरगाव जुनी वस्ती, वेलकम सोसायटी, प्रशांत कॉलनी मार्गाने यात्रा मुख्य स्थळी पोहचली. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्यावर दिसून आले. यावेळी कुणी फुलांची माळ तर कुठे पुष्पवर्षाव करत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी भगिनींनी स्वागताचे औषण करीत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाच्या मुद्दाला सर्वोतपरी घेऊन पश्चिम नागपुरात केलेल्या कामांची पोचपावती जन-आशिर्वाद यात्रेतून पाहयला मिळाली. यावेळी पावा बुद्ध विहार येथे यात्रेचा समरोप झाले.

यावेळी विकास ठाकरे यांनी जाऊन तथागत बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्यांना अभिवादन केले. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्पा सीआयडी ऑफिस येथून सुरुवात करण्यात आली. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. भव्य असलेली रैली पुढे कामगार नगर, अवस्थी नगर, सुगत कॉलनी, प्रशांत कॉलनी, लाला टाल, पेंशन नगर, नेहरु कॉलनी, बाजार रोड, केजीएन स्कूल, योगेंद्र नगर, फागो ले-आउट मार्गाने शारदा चौकात यात्रेचे समापन झाले. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादातून त्यांनी ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्याचा संकल्प केल्याचे शुक्रवारी दाखवून दिले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चांदा ते बांदा पर्यंत विकासाची गंगा सतत वाहत राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या - चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

Sat Nov 9 , 2024
कोदामेंढी :- मागील अडीच वर्षां पासून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार तर देशात मोदी सरकार असे डबल इंजिनचे सरकार असल्याने मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्रात विकासाची गंगा चांद्यापासून बांद्यापर्यंत वाहत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा मोदी सरकारला तिसऱ्यांदा सत्तेत बसवले असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विकासाची गंगा अशीच वाहत ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतही महायुती सरकारला बहुमताने निवडून देण्यासाठी तालुक्यातील, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!