सर्व श्वान मालकांना मनपात श्वान नोंदणी बंधनकारक

– पाळीव श्वानांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात : भारतीय प्रजातिच्या श्वानांची नोंदणीसाठी कमी शुल्क   

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने पाळीव श्वा‍नांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली आहे. मनपा हद्दीतील श्वान पाळण्याकरीता नागपूर महानगरपालिकेत नोंदणी करणे सर्व श्वान मालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. दहाही झोनमध्ये नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून, श्वान मालकांसाठी मनपाने केलेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. भारतीय प्रजातिच्या श्वानांची नोंदणीसाठी कमी शुल्क ठेवण्यात आला आहे.

मनपा हद्दीतील सर्व श्वान मालकांनी त्यांच्या पाळीव श्वानांची नोंदणी तीन महीन्याच्या अर्थात ९० दिवसाच्या आत करून घेणे बंधनकारक केले आहे. मनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये श्वान नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नोंदणीबाबत आवश्यक सुचना/परिपत्रक महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmcnagpur.gov.in/circularfordogregistration या लिंकवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विना नोदंणी करता श्वान मालकाद्वारे श्वान पाळल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास संबधित श्वान मालका विरुद्ध नियमान्वये कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

नागरिकांनी श्वानांची नोंदणी खालील अटी-शर्तींच्या आधीन राहून करून घ्यायची आहे.

– मनपा हद्दीतील सर्व श्वान मालकांनी त्यांचे पाळीव श्वानाची नोंदणी मनपात करून घेणे बंधनकराक आहे.

– श्वान नोंदणी करीता रू. ५०० प्रतिवर्ष प्रति श्वान नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.

– एक कुटुंब जास्तीत जास्त तीन श्वानाची नोंदणी करू शकतील. तीन पेक्षा अधिक श्वान पाळणाऱ्या कुटुंबास विशेष परवाना घेणे आवश्यक आहे.

– श्वानाच्या नोंदणीकरीता तसेच विशेष परवाना मिळविण्याणकरीता आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ‘अ’नुसार सादर करणे आवश्यक राहील.

– नोंदणी करताना श्वानाला Anti Rabies चे लसीकरण केलेले असणे व त्याबाबतचे पंजिकृत पशुवैद्यकाचे सही शिक्कासह प्रमाणपत्र किंवा लसीकरण बाबतचा रेकॉर्ड सादर करणे आवश्यक आहे.

– भारतीय प्रजातीच्या श्वान पाळण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, याकरिता भारतीय श्वान पाळणाऱ्या कुटूंबास नोंदणी शुल्क केवळ रू. २०० वर्ष प्रतिश्वान आकारण्यात येईल.

– भारतीय प्रजातिच्या श्वान पाळणाऱ्या कुटूंबाने त्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असल्यास नोंदणी शुल्क पूर्णतः माफ करण्यात येईल.

– भारतीय प्रजातिच्या श्वान व्यतिरिक्त इतर प्रजातीच्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असल्यास, अशा श्वान मालकास नोंदणी शुल्क केवळ रू. २०० प्रतिवर्ष प्रतिश्वान आकारण्यात येईल.

– श्वानाची नसबंदी केलेल्या मालकास नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात आलेल्या पशुवैद्यक यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

– श्वान मालकाने नसबंदी शस्त्रक्रिया/लसीकरण बाबतचे प्रमाणपत्र फर्जी/ चुकीचे प्रमाणपत्र आढळून आल्यास श्वान मालकावर रू. २०,००० पर्यंतचा दंड आकारण्यात येईल. तसेच नसबंदी शस्त्रक्रिया न करता प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आल्यास संबंधित पशुवैद्यक यांचेवर रू. २०,००० पर्यंत दंड आकारण्यात येईल.

– श्वान नोंदणी बाबत जाहीर सूचना प्रसिध्द केल्यापासून ३ महिन्याचे आत सर्व श्वान मालकांनी नोंदणी करून घेणे आवश्यक राहील. या मुदतीनंतर नोंदणी करणाऱ्या श्वान मालकास प्रतिदिवस रू. ५ दंड आकारण्यात येईल.

– श्वान नोंदणीचे प्रमाणपत्र हे १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाकरिता लागू राहील.

– प्रत्येक वर्षाच्या १ ते ३० एप्रिल या कालावधी मध्ये नोंदणी करणे आवश्यक राहील. त्या नंतर नोंदणी करणाऱ्या श्वान मालकास रू. ५ प्रति दिवस प्रमाणे दंड आकारण्यात येईल.

– विना परवाना किंवा नोंदणी न करता श्वान पाळताना आढळून आल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास प्रथम नोटीस बजावून नोंदणी करण्याची सुचना देण्यात येईल.ठराविक मुदतीत दंडा सह नोंदणी करून घेणे आवश्यक राहील. तसे न झाल्यास संबंधित श्वान मालकास रू. ५,००० प्रशासकीय दंड आकारण्यात येईल.

– आकारण्यात येणारा दंड सर्व प्रकारच्या श्वाना करीता लागु राहील.

– श्वान ओळख म्हणून मायक्रोचीप बसविणे योग्य राहिल.

– श्वानाला बाहेर नेताना साखळी व (Muzzle) म्यु.झेल असणे आवश्यक आहे. बाहेर फिरवताना श्वानाने कुठेही विष्ठा टाकू नये. याकरिता सोबत पॉप स्टी‍क (Poop stick) चा वापर करणे आवश्यक आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नदी सफाईचे ९० टक्के कार्य पूर्ण

Fri Jun 7 , 2024
– १५ जूनपर्यंत नद्यांचे स्वच्छता कार्य पूर्ण होणार नागपूर :- पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी आणि नाले सफाईचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने कार्याला मिळालेल्या गतीचे परिणाम दिसू लागले आहेत. नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिनही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण ९० टक्के स्वच्छता झालेली आहे. १५ जूनपर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com