नागपूर :- मध्य नागपुरातील गोळीबार चौक येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये फोटोच्या छायाचित्राला माल्यार्पण प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली .
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना काँग्रेसच्या नेत्या ॲड. नंदा पराते म्हणाल्या की महात्मा गांधी यांची विचारधारा प्रेम व न्याय देणारी असून शांततामय वातावरण निर्माण करणारी आहे. काँग्रेस विरोधात खोटें-नाटे रान उठवून द्वेषाचे राजकारण केले आणि नागरिकात भितीने वातावरण भाजपाने केले आहे. या विरोधात गांधी विचाराचा प्रचार व प्रसार करणे देश हितासाठी आवश्यक आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजातून द्वेषाचे व भितीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि शांततामय समाज व्यवस्था कायम करण्यासाठी महात्मा गांधी विचारांचे कार्य सुरू करण्याचे आव्हान केले.
मध्य नागपुरातील या जयंती कार्यक्रमात प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते, नागपूर महानगरपालिका चे भूतपूर्व उपमहापौर अण्णाजी राऊत, मध्य नागपूर काँग्रेसचे समन्वयक रमण पैगवार, नागपूर शहर काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष कृष्णा गोटाफोडे, पूर्व नगरसेवक राजू ताबूतवाले , नागपूर शहर काँग्रेसचे संघटन सचिव सुनील गुलगुलवार, पूर्व ब्लाक कार्याध्यक्ष प्रशांत बुरडे, ब्लॉक १६ चे उपाध्यक्ष गंगाधर बांदेकर ,पूर्व ब्लॉक अध्यक्ष सुकेश निमजे यांनी मार्गदर्शन केले.
मध्य नागपुरातील या जयंती कार्यक्रमाचे हलबा सेलच्या कार्याध्यक्ष मंद शेंडे ,मध्य नागपूर हलबा सेलच्या अध्यक्ष शकुंतला वट्टीघरे , मध्य नागपूर हलबा सेलच्या माया धार्मिक यांनी आयोजन केले तर मध्य नागपूर युवक काँग्रेस चे सचिव आयुष्य राऊत यांनी संचालन केले. आभार प्रदर्शन नागपूर शहर काँग्रेसचे संघटन सचिव विजया ताजने यांनी केले. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.