बालमृत्यु रोखण्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ यशस्वी करा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन

भंडारा :- केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर, रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याचे घ्येय निश्चित केले असुन, माहे ऑगस्टपासून तीन फेऱ्यांमध्ये विशेष ‘मिशन इंद्रधनुष्य’ 5.0 कार्यक्रम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेअंतर्गत शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील लाभार्थींचे सर्व लसीकरण करण्यात येणार आहे. बालमृत्यु व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ 5.0 मोहिमे यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हयातील सर्व ग्रामिण, नागरी व नगरपालीका कार्यक्षेत्रात ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिम राबविण्यात येणार आहे. 8 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ 5.0 पुढील तीन महिन्यांमध्ये राबविण्यात येणार असुन 7 ते 12 ऑगस्ट, 11 ते 16 सप्टेंबर आणि 9 ते 14 आक्टोंबर अशा तीन फेंऱ्यांमध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे. नियमित लसीकरण सत्राचे नियोजन निश्चित केलेल्य दिवशीच करण्यात येणार आहे. नियमित लसीकरण सत्राचा दिवस वगळून इतर दिवशी अति जोखीमच्या भागात अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘मिशन इंद्रधनुष्य’ 5.0 मोहिमेत शुन्य डोस, सुटलेले, वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचा भाग, जास्त दिवस नियमित लसीकरण न झालेले क्षेत्र, स्थलांतरीत लोकवस्तीचे क्षेत्र, सन 2022-23 मध्ये गोवर, घटसर्प व डांग्या खोकला उद्रेकग्रस्त भाग अशा विविध क्षेत्रात लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर यांनी माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor launches 150th Anniversary Celebrations of Anjuman I Islam'

Fri Jul 28 , 2023
Mumbai :- The yearlong celebrations of the 150th anniversary of Anjuman I Islam institution was launched in presence of Maharashtra Governor Ramesh Bais in Mumbai on Thursday (27 July). The Governor felicitated 57 faculty members and students of various educational institutions of Anjuman-I-Islam who obtained Ph. D. degrees at the function held at Anjuman’s Saif Tyabji Girls High School, Mumbai […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com