नागपूर :- नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.
महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे.
गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते.
महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे.
महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा.
गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणा-या ग्राहकांत नागपूर जिल्ह्यातील 19 हजार 61 आणि वर्धा जिल्ह्यातील 3 हजार 204 ग्राहकांचा समावेह आहे.