लोकतंत्र सेनानी संघाचा महायुतीला पाठिंबा

यवतमाळ :- महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना लोकतंत्र सेनानी संघानी पाठींबा दिला आहे. संघाचे अरुण भिसे यांनी तसे पत्रक प्रसिध्द करुन पाठिंबा जाहीर केला आहे.

लोकतंत्र सेनानी संघ हा १९७५-७६ च्या आपातकाळातील हुकूमशाहीशी संघर्ष करतांना तुरुंगवास भोगलेल्या सत्याग्रहींचा राष्ट्रव्यापी संघ आहे. भारतातील विविध प्रांताप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचे मानधन वाढविले होते. मात्र, मविआच्या उद्दव ठाकरे सरकारने स्वतंत्र सैनिकांचे मानधन थांबवले होते. महाविकास आघाडी सरकारच्या पतनानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार सत्तेत येताच सेनानींना त्यांचा मान सन्मान परत मिळाला. त्यामुळे सर्व लोकतंत्र सेनानी संघाने राजश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एव्हढेच नव्हेतर सर्व माजी सैनिक, स्वातंत्र सेनानी व त्यांच्या कुटुंबीयांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनाच मत द्यावेत, असे आवाहन देखिल लोकतंत्र सेनानी संघाचे प्रांतीय कार्य समिती सदस्य अरुण भिसे, सौ. उमा देशपांडे व सचिव पांडुरंग झिंजुर्डे यांनी केले आहे. हा लढा देशभक्त विरुद्ध फुटीरवादी यांच्यातील आहे. म्हणून पुन्हा हुकूमशाही, घराणेशाही येणार नाही, याची काळजी घेत महायुतीलाच मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छावनी में 21,से श्री हनुमान जन्मोहोत्सव सप्ताह

Mon Apr 22 , 2024
नागपुर :- श्री हनुमान मंदिर संस्थान, छावनी हनुमान मंदिर रोड, छावनी नागपुर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री हनुमान जयंती जन्मोत्सव मनाया जायेगा, रविवार दिनांक, 21/04/24 को अखंड रामांयान पाठ,/ आरती रात 9,बजे महिला मंडल द्वारा भजन, सोमवार दिनांक, 22/4/24 को दोपहर 1 बजे से गायत्री महिला सत्संग मंडल द्वारा सामूहिक प्राथना एवम हवन पूजन, रात 9, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com