Ø विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
नागपूर :- महर्षि वाल्मिकी यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. तहसिलदार रोहिणी पाठराबे, नायब तहसिलदार आर.के.दिघोळे, विवेक राठोड, नाझर अमित हाडके आणि विविध अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.