महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली नवीन 5 आयुक्तांना शपथ

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेअन्वयेराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिकपुणेनागपूरऔरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांकरिता राज्य सेवा हक्क आयुक्तांची  नियुक्ती केली आहे. या आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथ दिली.

            श्रीमती चित्रा विकास कुलकर्णीयांची आयुक्तराज्य लोकसेवा हक्क आयोगनाशिक महसुली विभाग,  श्री. दिलीप मोहनराव शिंदेआयुक्तराज्य लोकसेवा हक्क आयोगपुणे महसुली विभागश्री. अभय बुद्धदेव यावलकरआयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोगनागपूर महसुली विभाग,  डॉ. नरुकुल्ला रामबाबुआयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोगअमरावती महसुली विभाग आणि डॉ. किरण दत्तात्रेय जाधवयांनी आयुक्तराज्य लोकसेवा हक्क आयोगऔरंगाबाद महसुली विभागात राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेवून राज्य लोकसेवा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

            शपथविधीनंतर मुख्य आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिय म्हणालेमहाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तीना पारदर्शक कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरितातसेच शासकीय विभागअभिकरणे व इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ अंमलात आलेला आहे. अधिनियमाच्या कलम १३ पोट नियम-२ अन्वये प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार  पाच आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

            महसुली विभागातील आयुक्तांच्या नेमणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल तसेच अधिनियमाने निश्चित केलेल्या उद्देशांना चालना मिळेल असा विश्वास मुख्य आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिययांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

चंद्रपूर शहरातील खुल्या भूखंडांवरील घनकचऱ्याची सफाई करण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश 

Thu Dec 2 , 2021
– घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपा सुरु करणार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ मोहीम चंद्रपूर : शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलनाच्या कामाची तपासणी मनपायुक्त राजेश मोहिते यांच्यामार्फत सुरु आहे. त्याअंतर्गत वडगाव प्रभागाची तपासणी केली असता बरेचसे नागरिक व फ्लॅटधारक घंटागाडीमध्ये कचरा न देता खुल्या भूखंडावर कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे निर्माण होत आहेत. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), मुख्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!