नागपुर :- आय.जी.एम.सी. मेयो रक्तपेढी नागपूर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच व आकाशझेप फाउंडेशन रामटेक यांचा सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी श्याम आस्करकर महाराष्ट्र नाभिक मंडळ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र, गणपत चौधरी जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू ईजनकर जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ अग्रवाल रक्तपेढी प्रमुख इन्चार्ज, डॉ सागर Bto, चेतन मेश्राम , वंदना भगत, प्रितम मेश्राम संचालक करुणा फाऊंडेशन, भुषण सवाईकर जिल्हा संपर्क प्रमुख म ना म एकता मंच यांनी प्रामुख्याने उपस्थित दर्शविली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच चे जिल्हाध्यक्ष वैभव तुरक, कार्याध्यक्ष नितिन पांडे, उपाध्यक्ष प्रविण निंबाळकर, अध्यक्ष पुर्व नागपूर सुनिल येवले,रोशन नागपुरे, धीरज निम्भोरकर, अमित अंजनकर,प्रफुल ठाकूर तसेच मित्रमंडळी यांनी रक्तदान करून मानव सेवेच्या या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले. सध्या रक्तपेढी मध्ये रक्त साठ्याचा तुटवडा असल्यामुळे गरजूंना रक्त पुरवठा करायला खुप अडचणी येत आहे म्हणून इतर सामाजिक व राजकीय संघटनानी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र नाभिक मंडळ एकता मंच व आकाशझेप फाऊंडेशन तर्फे करण्यात आले होते. प्रस्तुत शिबिरासाठी साक्षोधन कडबे सचिव व मुख्य संचालक आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांचे महत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले.