महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर शहर व ग्रामीण: श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात

नागपूर :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर शहर, ग्रामीण व महीला आघाडी तर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक सहकारी बँक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दही हंडी भजन व्दारे, दहीहंडी फोडून, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण अप्पा गवळी अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक भाले, माजी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब गलाट, निवृत्त विक्रीकर आयुक्त सोमनाथ नडंगे, निवृत्त अतिरीक्त पोलीस महासंचालक टिकाराम भाल, नगरसेविका मंगला खेकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक मन्नुभाई हिरणवार, आनंदराव कालोकर, सदाशिव खडके, रामजी मोरे, मदन साखरकर, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, शहर अध्यक्ष जगन्नाथ गराट, महीला आघाडीच्या अध्यक्ष निर्मला साठे, पं.स.भिवापुरच्या सभापती माधुरी देशमुख, रामकृष्णन अय्यर, शालीकरांम अरबट, शेवकराम चंद्रवंशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पाहुण्यांच्या स्वागतानंतर माजी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब गलाट यांना हंसराज अहिर व अन्य मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर च्या वतीने गवळी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गवळी समाजाचे दैवत गौमातेची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी गवळी समाजातील सेवा निवृत्त अधिकारी, सरपंच, सभापती, जिल्हापरीषद सदस्य, पं.स.सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गवळी समाजातील १० वी व १२ वी तील गुणवत्ता प्राप्त ५२ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तसेच भावना वैद्य ची एमपीएससी च्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी भटक्या जमाती ब मधून राज्यात पहिली आल्याने आणि समीर देशमुखने तिसऱ्या राज्यस्तरीय स्यांबो कुस्ती स्पर्धेत सुर्णपदक मिळवल्याने संघटने कडून मोमेन्टो, नोटबुक, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धा गीतगायन स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा, वैयक्तीक नृत्य स्पर्धा, सामुहीक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्यात व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली. यासाठी कोमल अवथरे, भारती मोरे व महीला आघाडीच्या पदाधीकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत. हंसराज अहीर यांनी आपल्या संबोधनातून भगवद्गीतेचा उल्लेख केला. युगप्रवर्तक भगवान श्रीकृष्णाच्या कुळात आपला जन्म झाला हे आपले परमभाग्य असल्याचे ते म्हणाले. समस्त गवळी बांधवांनी याचा सार्थ अभीमान बाळगावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समस्त गवळी समाज एकजूट व्हावा. व त्यांनी जन्माष्टमीचा कार्यक्रम आयोजित करावा ही अतिशय आनंदाची बाब असून, नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल स्तूती केली. समाजाच्या विविध समस्या सोडविण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे ही त्यांनी कौतुक केले. गवळी समाज संघटनेच्या नागपूर शहर व जिल्हा शाखेच्या वार्षिक अंकाचे यावेळी हंसराज अहिर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. हा अंक शैलेश हातबुडे यांनी संपादित केला. सोबतच त्यांनी गवळी समाज संघटना नागपूर च्या वार्षिक अहवालाचे वाचन करत वर्षभरातील केलेल्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्तावीकातून जगन्नाथ गराट यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामण अप्पा गवळी यांनी समयोचीत भाषणे केले. संचालन चंद्रकात मोरे, शैलेश हातबुडे व कोमल अवथळे यांनी केले तर आभार प्रभाकर देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवकराम भट, शंकर साठे, प्रशांत हातबुडे, रमेश पोहनकर, लोनेश देशमुख, रामदयाल नरकंडे, परसराम भड, रविंद्र अवथरे, राजू साखरकर, कृष्णा भाल, शाम पोहणकर, मोहन देशमुख, श्रावण सपकाळ, रितेशअरबट, ईश्वर काळे, कृष्णप्रसाद साखरकर, शंकर भड, संजय देशमुख, सुनंदा आसोले, भारत गराट, कल्पना देशमुख यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतलेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कमला नेहरू महाविद्यालयाच्या खेळाडूंना जलतरण स्पर्धेत सात सुवर्णपदक

Sun Sep 17 , 2023
नागपूर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने सुरू असलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी रूद पालकृत याने 100 मीटर, 200 मीटर बैकस्ट्रोक व 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि या जलतरणच्या उपप्रकारामध्ये मंडन पातलोनमध्ये सुध्दा सुवर्णपदकाची कमाई केली. रुद पालकूत याने या स्पर्धेत एकूण चार पदक पटकावले. त्याचप्रमाणे चैतन्य चौधरी याने सुध्दा 100 मीटर व 50 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com