‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तक प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे राजभवन नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी आयोजन – कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजभवन नागपूर येथे आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री लोढा म्हणाले की, महाराष्ट्र हा आपल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने आणि विचाराने महाराष्ट्र समृध्द आह. या महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्व यशस्वीपणे अंगिकारले होते,असे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर या महापुरुषांच्या कौशल्य विषयक अप्रतिम ध्येय धोरणाची ओळख व महात्म्य आजच्या विशेषत: कौशल्य शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीला होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

मंत्री लोढा म्हणाले की,”महापुरुषांचे कौशल्य विचार” या पुस्तकात महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्यामुळे व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्याचे कौशल्य वाढण्यासही मदत होईल.औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त “महापुरुषांचे कौशल्य विचार” हा विषय आयटीआयच्या विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठीत समितीने तयार केलेल्या या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे असेही मंत्री लोढा म्हणाले.

मंत्री लोढा म्हणाले की, बहुआयामी व्यक्तीमत्व स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या नावाने शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्य विकास क्षेत्रात भरीव योगदान देणा-या व्यक्तींना स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर,कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईचे उप आयुक्त दि.दे.पवार यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ व सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करणार - ना. धर्मरावबाबा आत्राम

Mon Dec 11 , 2023
◆ अन्न व औषध कार्यालयाच्या नवीन वास्तुचे कोनशिला अनावरण व भूमीपूजन गडचिरोली :- निरोगी आयुष्यासाठी उत्तम आहार हा महत्वाचा घटक आहे. कोरोनाच्या महामारीनंतर नागरिक स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागृत झाले असून अन्नधान्यामध्ये भेसळ रोखण्यासाठी तसेच नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ व सकस अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे बळकटीकरण करणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. गडचिरोली येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com