नागपूर :-आंबेडकर राईट फेडरेशन ऑफ इंडिया च्यावतीने 23 जानेवारी मंगळवार ला, महाकवी डॉ. भास्कर सुमन ( मेश्राम ) सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मूकनायक हॉल, आनंद बुद्ध विहार, सिताबर्डी येथे करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अशोक रामटेके यांच्या हस्ते दुपारी १ वाजता. होणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून राहणार आहेत.
डॉ. सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव, तसेच चूप नही रहूंगा मै, या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम राहतील प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. उद्धव रंगारी डॉ. चंद्रशेखर बांबोळे, इंजि. विजय मेश्राम, सैजल चंद्रशेखर टेंभुर्णे, जयंत टेंभुर्णे, प्रकाश शेरेकर, रवी शेंडे, रमेश ठेंगडी, बबन धोटे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमात यावर्षी डॉ. लक्ष्मण लोखंडे यांना महाकवी भास्कर सुमन ज्ञानपीठ पुरस्कार, चारूशीला डोके यांना जीवन गौरव, डॉ.अरुण पांडे अश्विनी कुमार, सिद्धार्थ कोचे इत्यादींना मोहम्मद रफी राष्ट्रीय स्मृती पुरस्कार तर कल्पना माहुरकर, ऋतुजा अवतारे यांना शबाना आजमी राष्ट्रीय अभिनय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच डॉ. तन्हा नागपुरी, ॲड. शारु तुषार अवतारे, मिलिंद मानकर, पंडित गायकवाड, राहुल सोमकुवर, रोशन राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर सदाबहार गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. डॉ.अरुण पांडे, अश्विनी कुमार, सिद्धार्थ कोचे, चारुशीला डोके, कल्पना माहुरकर, शेरेकर, निमखेडकर सुरेश कुमार, आकाश गजभिये, इत्यादी गायक कलावंत आपले गीते सादर करणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.