महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत मिळविले घवघवीत यश!

 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण

 महाज्योतीच्या प्रशिक्षकांना दिले श्रेय !

 नागपूर : जेईई मेन्स ही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच या परिक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाज्योतीला आणि त्या माध्यमातून शिकवत असलेल्या सर्व प्रशिक्षक वर्गास दिलेले आहे. ज्यांनी नियमित, वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जुळून त्यांना समजेल असे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारुन वेळोवेळी त्यांच्या शंकेचे निरसन केले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, अतुल सावे नागपूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी या योजनेचा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनीही जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

संकेत वांदिले, नागपूर येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत

मी संकेत वांदिले, उमरेड येथील रहिवासी आहे. जेईई मेन्स परीक्षा पास करने माझे स्वप्न होते. पण यासाठी लागणारे महागडे क्लासेस लावणे शक्य नव्हते. तसेच ग्रामीण भागात परिक्षेच्या तयारीचे अन्य कुठले साधनही उपलब्ध नव्हते. त्यावेळी महाज्योतीच्या वेबसाइटवरुन मला जेईई मेन्स या प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. यात मी ऑनलाईन अर्ज दाखल केला. आणि माझी निवड झाली. या प्रशिक्षण योजनेमार्फत ऑनलाईन क्लासेससाठी मोफत टॅबसह, मोबाईल डेटा देण्यात आला. सर्व विषयांचा पुस्तकांचा एक संचही घरपोच देण्यात आला. ऑनलाईन क्लासेसची, पुस्तकांची, प्रशिक्षकांची जेईई मेन्स प्रशिक्षणास खुप मदत झाली. आज मी 95 ट्क्के मार्क घेऊन पास झाले. माझे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार झाले. यासाठी महाज्योती संस्था, प्रशिक्षक, संचालक साऱ्यांचे आभार.

अंश येलोरे, नागपूर येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत

मी अंश येलोरे, नागपूर येथील रहिवासी आहे. इंजिनियर होण्याच स्वप्न उराशी बाळगून मी शिकत होतो. पण जेईई मेन्सची तयारी करण्याची वेळ आली तेंव्हा मात्र त्यासाठीचा महागडा खर्च पाहून उदासलो. त्यावेळी मित्राकडून महाज्योतीच्या जेईई मेन्स या प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. यात मी ऑनलाईन अर्ज दाखल केला. आणि माझी निवड झाली. या प्रशिक्षण योजनेमार्फत ऑनलाईन क्लासेससाठी मोफत टॅबसह, मोबाईल डेटा देण्यात आला. सर्व विषयांचा पुस्तकांचा एक संचही घरपोच देण्यात आला. ऑनलाईन क्लासेसची, पुस्तकांची, प्रशिक्षकांची जेईई मेन्स प्रशिक्षणास खूप मदत झाली. आज मी 90 ट्क्के मार्क घेऊन पास झालो. माझे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार झाले. महाज्योती बहुजन विद्यार्थ्यांचे स्वप्न घडवणारी संस्था आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुष्ठरोग पंधरवाड्यानिमित्त मातकेचेरी येथे सीएमईचे आयोजन

Tue Feb 14 , 2023
नागपूर : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांच्या वतीने 30 जानेवारी प. पू. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातियी निमीत्ताने तसेच कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाडा 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे, त्याअनुषंगाने आज 12 फेब्रुवारीला खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांच्या (Private Practitioners) च्या CME चे आयोजन सार्वजनिक आरोग्य संस्था, माताकेचेरी येथील ‘चिंतन’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com