• वर्धा रोड डबल डेकर उड्डाणपूल, मेट्रो स्थानके रेकॉर्ड बुकमध्ये
• महा मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानांचा तुरा
नागपूर: महा मेट्रो नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानांचा तुरा रौवला गेला असून २ महत्वाच्या प्रकल्पांना अतिशय प्रतिष्ठेचे अश्या आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा सन्मान प्राप्त झाला आहे. महा मेट्रोच्या २ प्रकल्पांना अश्या प्रकारे रेकॉर्ड करता निवड होणे हे महा मेट्रोच्या उत्कृष्ट कामाचे पारितोषिक आहे. महा मेट्रोला या आधी अनेक महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले असून हा रेकॉर्ड म्हणजे एक मैलाचा दगड आहे.
रेकॉर्डसाठी दोन प्रकल्पाची निवड झाली असून रेकॉर्ड करिता नामांकित करण्यात आलेले २ प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:
१. वर्धा मार्गावरील विद्यमान महामार्गावर हायवे फ्लाय-ओव्हरसह सर्वात लांब व्हायाडक्ट: मेट्रो रेल सिंगल कॉलम पिअर्सवर हायवे फ्लायओव्हर आणि त्याच ठिकाणी मेट्रो रेल्वे मुख्य म्हणजे सुरवातीला या कार्याकरिता स्वतंत्र पिअर तयार करण्यात होते, नंतर याचा आढावा घेत डबल डेकर व्हायाडक्ट तयार करण्यासाठी महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डबल डेकर व्हायाडक्ट पहिल्या स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि दुसऱ्या स्तरावर मेट्रो रेल्वेचे संचालन ज्यामुळे जमिनी मार्गावर विद्यमान महामार्गासह तीन स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे याकरिता अतिरिक्त भूसंपादन करण्याची गरज पडली नाही. ज्यामुळे जमिनीची किंमत आणि बांधकामाचा वेळ तसेच प्रकल्पाचा खर्च कमी झाला.
२. डबल डेकर व्हायाडक्टवर निर्माण करण्यात आले सर्वात जास्त मेट्रो स्टेशन: वर्धा रोडवरील 3.14 किमी लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टमध्ये छत्रपती नगर, जय प्रकाश नगर आणि उज्वल नगर अशी तीन मेट्रो स्टेशन आहेत. या स्थानकांना विशेष नियोजनाची आवश्यकता असते ज्यामध्ये मेट्रोच्या कार्यात्मक संचालन पूर्तता करण्यासाठी विशिष्ट् स्थाषनकाच्या् विशिष्ट् मर्यादा तसेच डबल डेकर व्हायाडक्ट चे निर्माण कार्य या स्थानकांची अभियांत्रिकी विचार-प्रक्रिया, संकल्पना, डिझाइन आणि अंमलबजावणी हे आव्हानापेक्षा कमी नव्हते.
महत्वाचे म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे सन्मान प्राप्त होण्याची हि पहिली वेळ नसून या आधी मार्च २०१७ मध्ये `सेफ्टी ऐट वर्क’ (कार्यस्थळी सुरक्षा) या विषयावर सर्वात मोठी मानव शृंखला बनवण्याबद्दल अश्याच प्रकारे नोंद झाली होती. त्या मानव शृंखलेत महा मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि इतर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून महा मेट्रोला अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत.
अश्या प्रकारे मेट्रोच्या दोन प्रकल्पांची आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स सारख्या प्रतिष्ठित सन्मानाकरता निवड होणे अतिशय महत्वाचे आहे. या सारखे आणखी काही नवीन रेकॉर्ड महा मेट्रो तर्फे स्थापित होतील हा विश्वास आहे. महा मेट्रो अतिशय उत्कृष्ट प्रकारे प्रकल्पाचे नियोजन, संचालन आणि त्याची अंमलबजावणी करीत असल्याचे द्योतक आहे.