मेट्रो मालमत्तेचे विद्रुपीकरण करू नये, महा मेट्रो नागपूरचे नागरिकांना आवाहन

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

नागपूर :- नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व स्थानकांवर तसेच मेट्रो ट्रेनच्या आत स्वच्छता ठेवण्यास येथील कर्मचारी कटिबद्ध आहेत. म्हणूनच या स्वच्छतेची मेट्रो प्रवाश्यांकडून सातत्याने प्रशासना केली जाते. एकीकडे स्थानके आणि ट्रेन अंतर्गत स्वच्छता ठेवण्याचा प्रामाणिक पर्यंत मेट्रो कर्मचारी करीत असतानाच, मेट्रो पिलर वरील कुठ्ल्यास प्रकारचे पोस्टर किवा जाहिरात करू नये, ही विनंती नागपूर मेट्रो तर्फे केली जात आहे.

मेट्रो खांबांचे (पिलर) विद्रुपीकरण झाल्यास भारतीय दंड सहिता १८६० च्या कलम २९४ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या कलमांतर्गत अश्या प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्याऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते तसेच त्याच्याकडून दंड देखील आकाराला जाऊ शकतो. महा मेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतांना दुसरी कडे मात्र या प्रकल्पांतर्गत असलेल्या मालमत्तेचे विद्रुपीकरण होत असल्याच्या घटना घडत आहेत.

मेट्रो पिल्लर वर पोस्टर, जाहिरातीचे फलक लावणे, लिखाण करणे किंवा कुठल्याही प्रकारे विद्रुपीकरण करणे बेकायदेशीर असून हा दंडात्मक गुन्हा द्खील आहे. गाड्या आणि स्थानकांप्रमाणेच रस्त्यावरील खांब (पिलर) देखील स्वच्छ ठेण्यास नागपूर मेट्रोला सहकार्य करावे ही विनंती करण्यात येत आहे. शहरात सुचारू वाहतूक व्यवस्था देण्याचा महा मेट्रोचा मनोदय असून या प्रकल्पाला नागपूरकरांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन देखील या निमित्ताने केले जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’पर्यटन धोरण जाहीर

Mon Dec 4 , 2023
नागपूर :- नागपूर विभागातील सर्व पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि या क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या महिला उद्योजकांनी हॉटेल रिसोर्ट,होम स्टे, कृषी पर्यटन केंद्र साहसी पर्यटन केंद्र उपहारगृह, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नविन व्यवसाय इच्छुक महिला उद्योजकांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पर्यटन विभागाने ‘आई’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com