यवतमाळ :- महायुतीचे यवतमाळ विधानसभेचे उमेदवार मदन येरावार यांना जागोजागी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज झालेल्या वडगाव, रातचांदना, मुरझडी, बोथगव्हाण परिसरात प्रचार सभे दरम्यान एका महिलेने अनुभव कथन केले. दुर्धर आजाराने त्रस्त असताना आणि योजनेत बसत नसतांना मदन येरावार यांनी तत्परता दाखविली आणि उपचार झाल्याची हकीकत सांगत, ‘ माता – भगिनींच्या पाठीशी भक्कपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे मदन येरावार असे भावोद्गार काढले.
निवडणूक प्रचाराने वेग घेतला असुन महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांना मतदार संघातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात झालेली हजारो कोटी रुपयांची विकासकामे येरावार यांची जमेची बाजू आहे. आज मतदारसंघातील नाकापार्डी, जांब, मुरझडी, रातचांदना, बोथगव्हाण, धानोरा, वडगाव गाढवे या परिसरातील प्रचारास मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रचारादरम्यान वडगाव गाढवे येथील वंदना राठोड यांनी मदन येरावार यांच्या कार्यतत्परते बद्दल अनुभव कथन केले. वंदना राठोड ह्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. त्यांचा आजार योजनेत बसत नव्हता, घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी आपल्यावर उपचार होतील अशी आशाच सोडली होती. अनेकांकडे मदत मागूनही काही प्रतिसाद मिळाला नाही अशात त्या मदन येरावार यांना भेटल्या. भाऊंनी हकीकत ऐकून घेत दवाखान्यात भरती होण्यास सांगितले. त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेतली व त्यांच्यावर उपचार झाले. या घटनेनंतर वंदना भावविभोर झाल्या. त्यांनी हा अनुभव स्वयंप्रेरणेने प्रचार सभेत कथन केला. माता भगीनिंच्या पाठीशी भक्कपणे उभे राहणारे नेत्रुत्व म्हणजे मदन येरावार असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले.