श्री राम नगर योग नृत्य परिवारा तर्फे जागतिक महिला दिन साजरा 

महिला दिनी हुडकेश्र्वर पो स्टे च्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपुर :- जागतिक महिला दिनी श्रीराम नगर योग नृत्य परिवार तर्फे हूडकेश्र्वर पोलिस स्टेशन येथील सतरा महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी याना नऊ महानायिकांची प्रतिमा फोटो सप्रेम भेट देत सत्कार करून महिलां पोलिसाचा गौरव करण्यात आला.

बुधवार (दि.८) मार्च ला श्रीराम नगर योग नृत्य परिवार तर्फे जागतिक महिला दिवस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हूडकेश्र्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विक्रांत संगणे  तर प्रमुख अतिथी म्हणुन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पारधी व पोलिस उपनिरीक्षक मिसाळ यांच्या हस्ते नऊ महाना यिकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ” माणसाने माणसाशी माणसासम वागणे….. ” ही प्रार्थना घेण्यात आली. पारधी यांनी सासु – सुने चे संबंध कसे असावे या विषयावर प्रकाश टाकला. मिसाळ  यांनी योगाद्वारे आपले शरीर सुदृढ, निरोगी ठेवण्याकरिता महिलांना स्वतःसाठी दररोज वेळ काढण्याचे आवाहन केले. विक्रांत संगणे श्रीराम नगर योग नृत्य परिवाराच्या हया उपक्रमाचे कौतुक करून स्तुती केली. १७ महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नऊ महनायिकांच्या प्रतिमा सप्रेम भेट देऊन सत्कार करून महिला पोलिसाचा गौरव करण्यात आला. योग प्रशिक्षिका छाया कुरुटकर हयांनी आपल्या प्रास्ताविकातुन महिला दिवस इतिहासाचे महत्व स्पष्ट करित उत्कृष्ट संचालन केले. तर प्रिया कडु हयानी उपस्थित सर्वाचे आभार व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सोनाली कडु, सोनु खांबलकर, स्वाती नवले, शुभांगी भागवतकर, प्रिया तिरपुडे, प्रज्ञा भगत, कविता पाटील, निकिता झीलपे, गायत्री बोरकर, माधुरी लाडेकर, मालती काळे, गौराबाई कुरुटकर, लता खांबलकर, अनु काळे हयानी मोलाचे सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com