नागपूर :- गुन्हे शाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे लकडगंज हहीत, आदर्श नगर, गरोवा मैदान, शिदिचे घरा समोर, सार्वजनिक रोडवर एका ईसमावर संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यानी त्यांचे नावे हासीम राशीद शेख, वय २२ वर्षे, रा. गरोबा मैदान, माटे चौक, लकडगंज, नागपुर असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ ०५. ग्रॅम ८३० मिली गॅम एम.डी. पावडर किंमती ५८,३००/-रू, ची मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी पावडर, एक मोबाईल फोन, व रोख १,१२०/- रू असा एकूण ७९,४२०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची अधिक विचारपुस केली असता, तो पाहीजे आरोपी गोलू बोरकर, रा. नंदनवन, नागपुर याचे मदतीने अंमली पदार्थांची खरेदी-विकी करीत असल्याचे सांगीतले. आरोपोंचे हे कृत्य कलम ८ (क), २२(ब) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने आरोपीविरूष्ट पोलीस ठाणे लकडगंज येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. अरक आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई कामी लकडगंज पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ३ वे अधिकारी व अंमलदार यांनी केली.