नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. मनपाच्या अमृत महोत्स्वानिमित्त विशेष लोगो तयार करण्यात येत आहे. याकरिता मनपाद्वारे लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छूकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
२ मार्च २०२५ रोजी नागपूर महानगरपालिका ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मनपाच्या या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने विशेष लोगो तयार करण्यात येणार आहे. मनपाचे “अमृत महोत्सवी वर्ष 2025-26” आशयाचा अधिकृत लोगो वर्षभर उपयोग करण्यात येणार आहे. जनतेच्या कल्पनांमधून नागपूर महानगरपालिकेचा विशेष लोगो तयार व्हावा, या उद्देशाने लोगो करिता विशेष स्पर्धा घेण्यात येत आहे.
इच्छूकांनी आपण तयार केलेले लोगो स्वत:चा नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांकासह 75yearsnmc@gmail.com या ई-मेल आयडीवर लोगो 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाठवावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.