स्व.अरविंद शहापूरकर यांचे भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी दिला आठवणींना उजाळा

नागपूर :- भारतीय जनता पक्षाने अत्यंत कठीण काळ बघितला आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे पक्षाला आज चांगले दिवस आले आहेत. स्व. अरविंद शहापूरकर यांनी देखील संघर्षाच्या काळात भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान दिले, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्व. शहापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने बीआरए मुंडले सभागृहात ज्येष्ठ भाजप नेते स्व. अरविंद शहापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सहसंघचालक श्रीधर घाडगे, ज्येष्ठ प्रचारक रवी भुसारी, माजी आमदार चैनसुख संचेती, मिरा शहापूरकर, आमदार रणधीर सावरकर, जगदीश गुप्ता, भाजप संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी नगरसेवक संजय बंगाले यांची उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘अरविंदजींनी पक्षाचे काम सुरू केले तेव्हा पक्ष वाईट स्थितीत होता. त्यांनी संघटनात्मक कार्य करताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात उभे राहिले. त्यांना सांभाळून घेतले. ते प्रत्येकाचे शांतपणे ऐकून घेत. अरविंदजींच्या कृतीमधून आणि वागणुकीतून शुद्ध सात्विक प्रेम झळकायचे.’ अरविंदजींनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी काम केले, असेही ते म्हणाले. ‘अरविंदजींनी आयुष्यभर विचारांशी कटिबद्धता ठेवली. संघटनेचे हित लक्षात ठेवून त्यांनी प्रत्येक निर्णय घेतला. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी पक्ष आणि देशासाठी समर्पित केला. विदर्भात पक्ष वाढविण्याच्या प्रक्रियेत अरविंदजींचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे,’ याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सातत्याने प्रवास करणे आणि जनसंपर्क उभा करणे ही स्व. अरविंदजी शहापूरकर यांची बलस्थाने होती’, असे सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'मिहान' हे विदर्भाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Sep 25 , 2023
– एक लाख तरुणांना रोजगाराचा संकल्प नागपूर :- मिहानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. सध्या एचसीएल, टीसीएस, इन्फोसीस, टेक-महिंद्रा सारख्या अनेक कंपन्यांनी रोजगाराचे दालन खुले केले आहे. काही कंपन्यांचे काम सुरू झाले आहे, तर काहींनी नागपूरमध्ये उद्योग सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळात मिहान हे विदर्भाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com