संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– येरखेड्यात साकारले प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
कामठी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 19 ऑक्टोबर ला पार पडलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कामठी तालुक्यातील येरखेडा येथील राज रॉयल लॉन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प अध्यक्ष निशा सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान,जी प सदस्य मोहन माकडे,भाजप कामठी तालुका अध्यक्ष उमेश रडके, शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,सुनील खांनवाणी,माजी सरपंच मनीष कारेमोरे,माजी सरपंच मंगला कारेमोरे, माजी सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, अमोल घरडे तसेच तहसीलदार अक्षय पोयाम,बीडीओ प्रदीप गायगोले यासह कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील मोठी बाजारपेठ, स्थानिक अर्थव्यवस्थेचे केंद्र,जास्तीत जास्त लोकसंख्या असलेले व दळणवळणची सोय असलेल्या प्रत्येक तालुक्यातुन एक गाव निवडण्यात आले त्यानुसार कामठी तालुक्यातुन येरखेडा गावाची निवड करण्यात आली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या ऑनलाईन उदघाटन नुसार येरखेडा ग्रामपंचायतीत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी असल्याचे मौलिक मत आमदार टेकचंद सावरकर यांनी व्यक्त केले.