प्रोत्साहनपर लाभ मिळविण्याकरिता आधार कार्ड बँक खात्यास लिंक करा – जिल्हा उपनिबंधक

भंडारा :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सन 2017-18 ते 2019-2020 या तीन आर्थीक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पिक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे वापरात असलेले बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. एकूण कर्जखाते विशिष्ट क्रमांक 37621 असून 36 हजार 627 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले आहे तर अद्यापही 994 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नजिकच्या आधार केंद्रावर आवश्यक आगदपत्र घेवून जावे व आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शुध्दोधन कांबळे यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 139 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Tue Dec 13 , 2022
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (12) रोजी शोध पथकाने 139 प्रकरणांची नोंद करून 59100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com