‘प्रज्ञाचक्षु’ सह टाकूया एक पाऊल स्वच्छतेकडे

– मनपाचा ‘वॉक विथ ब्लाइंड चाईल्डस ‘ अभिनव उपक्रम २६ रोजी

 – नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. जोशींचे आवाहन

नागपूर: स्वतःच्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी प्रज्ञाचक्षु (दृष्टिहीन) यांनी देखील पुढाकार घेतला असून, इतर नागरिकांनी ही या अभियानात साथ द्यावी हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिका, ज्ञान ज्योती अंध विद्यालय, राष्ट्रीय दृष्टिहीन पुनर्वसन संस्था आणि नागपूर @2025 यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.26.फेब्रुवारी रोजी सकाळी ७. ३० वाजता सिव्हिल लाईन्स स्थित रामगिरी चौक येथे ‘वॉक विथ ब्लाइंड चाईल्डस’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक प्रयत्नशील आहे. अशात दिव्यांगा बांधव आणि प्रज्ञाचक्षु (दृष्टिहीन) व्यक्ती हे देखील आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्नरत आहेत. पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहिचावा या उद्धेशाने रविवारी ‘वॉक विथ ब्लाइंड चाईल्डस’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमादरम्यान ‘स्केटींग आणि स्वच्छता रॅली’ काढण्यात येणार आहे. ज्ञान ज्योती अंध विद्यालयच्या विद्यार्थ्यांतर्फे रामगिरी चौकातून वॉकर रोडवर स्वच्छता रॅली काढण्यात येणार असून, सेव्हिंग ड्रीमझ फाउंडेशन आणि रोहित देशपांडे स्केटींग अकादमी यांच्या सहकार्याने स्केटींग रॅली काढण्यात येणार आहे.

या उपक्रमाला राष्ट्रीय दृष्टिहीन पुनर्वसन संस्था, नागलवाडी, नागपूरचे अध्यक्ष, भाऊ दायदार, नागपुर@2025 चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे यांच्यासह नागपूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्पिरोमेट्रीच्या पूर्व परिषद कार्यशाळेला उदंड प्रतिसाद

Sat Feb 25 , 2023
नागपूर :- बाहो 25 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित एम ए येथे पहिली राष्ट्रीय परिषद “बाहोकॉन 2023” आयोजित करणार आहे. “सोसायटीकडे परतफेड” या उद्देशाने ही परिषद भरविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, (BAHO) 2022-23 द्वारे 1ली राष्ट्रीय बहोकॉन 2023 परिषद आयोजित केली जात आहे. बाहोकॉन 2023 चे आयोजन टीम बाहो: 2021-23 नागपूर, महाराष्ट्र, यांच्या नेतृत्वाखाली केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com