अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच बैठक घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय

मुंबई :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

आंदोलकांच्या शिष्टमंडळांने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदनतीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

29 वां COMP-EX 2023 संस्करण 12 जनवरी से

Thu Jan 5 , 2023
Nagpur :- कॉम्प-एक्स की पुनः हो रही वापसी अपने 29वे संस्करण में तह निश्चित रूप से धमाकेदार होगी । दुनिया जब कोविड महामारी और लागू लॉक-डाउन अवधि की चपेट में थी, इस वजह से अतीत में 28 संस्करणों तक निरंतर आयोजित प्रमुख IT प्रदर्शनी कॉम्प-एक्स को दो साल का अंतराल लेना पड़ा। वीसीएमडीडब्ल्यूए ने एक जिम्मेदार और नागरिक-केंद्रित पहल सब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com