– मनपाच्या बाजीराव साखरे वाचनालयातील कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची हजेरी
नागपूर :- नागपूर महानगरपालिका बाजीराव साखरे वाचनालय(ई-ग्रंथालय) येथे आयोजित अनुभव कथन कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या गटाने नुकतेच हजेरी लावली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सांगितलेल्या अनुभवातून वाचनालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवले.
नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल वनामती संचालक डॉ. मिताली सेठी, सिपीटीपीच्या संचाकाल सुवर्णा पांडे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा २०२२ च्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेले विनायक पाटील, सोनाली म्हात्रे, शशिकांत बाबर या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या गटाने नुकतेच अनुभव कथन कार्यक्रमाला हजेरी लावली.
प्रशिक्षणार्थी अधिकारी सध्या शहरातील वनामती येथे प्रशिक्षण घेत आहे. याप्रसंगी सहायक ग्रंथपाल विशाल शेवारे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. उपस्थित प्रत्येक प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव कथन केले, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे, शंकाकुशंकेचे निरसन केले. अनुभव कथनाचा कार्यक्रम अंत्यंत उत्साहाने पार पडला आहे.
आपल्या अनुभव कथन करताना विनायक पाटील यांनी लॉ ऑफ अट्राकशन चा वापर करीत आपण जिद्दीने आपलं ध्येय कस गाठल याबद्दल सांगितले सोनाली म्हात्रे यांनी बँकेचे नोकरी सोडून, घरी त्यांच लहान बाळ असतानाही राज्यसेवा सारखी परिक्षा कशी पास करता येते, या बद्दल मार्गदर्शन केले. सुप्रिया चव्हण यांनी अधिकारी झाल्यावर आपल सामाजिक भान जपत टेलीग्रामद्वारे त्या कशा फ्री मेंटोरशीप प्रोग्राम चालवितात अणि विद्यार्थ्याना मदत करतात याबद्दल सांगितले. नेहा कांथे यांनी अभ्यासाची पद्धत आणि आयोगाच्या प्रश्नांचे अचूक विश्लेषण कसे करावे यावर भाष्य केले. शशिकांत बाबर यांनी पुण्याला न जाता घरीच कसा अभ्यास करता येतो, सोबतच एक्साम प्रेशर, स्ट्रेस, एंक्सायटी अशा विविध समस्यांवर भाष्य केले. निवृत्ती भालकर यांनी परीक्षेचे अचूक नियोजन कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सुरज बिस्कीटे यांनी आयोगाचे प्रश्नांचे विश्लेषण करतांना रिव्हर्स इंजिनियरिंगची क्लृप्ती बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाला विशाल शेवारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली निकोसे यांनी केलें तसेच आभार भीमराव राऊत यांनी मानले केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयाच्या चमूने तसेच सर्वश्री नितीकेश गायकवाड, मोहम्मद रझा, प्रशिक उंदीरवाडे, अंकुश दिघाडे, संघर्ष रामटेके, कपिल वाघमारे, काजल मेश्राम, पुजा राऊत, अश्विनी मोहोड, आदेश दांडी,आशिष बोरकर,उमाकांत इंदुरकर, शुभम अंबादेने सहकार्य केले.