दिशा योजने अंतर्गत कायदेविषय शिक्षण शिबीर संपन्न

गडचिरोली : तालुका विधी सेवा समिती,धानोरा तर्फे मौजा,गिरोला,ता.धानोरा,येथे गिरोला ग्रामपंचायत सभागृहात 14 जानेवारी 2023 रोजी दिशा योजने अंतर्गत कायदेविषय शिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.आर.खामतकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती धानोरा,तथा दिवाणी न्यायाधिश,( कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी धानोरा हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कोमलवार अति.संवर्ग विकास अधिकारी,प.स. धानोरा. राहुल गावडे, पॅनल अधिवक्ता ता.वि.से.स.धानोरा, चौधरी,पोलीस उप निरिक्षक,पो.स्टे. चातगाव,करंगामी, महिला व बाल संरक्षण अधिकारी, धानोरा, यु.एम.मडावी,अधिवक्ता, जांभुळकर , ग्रामसेविका, गिरोला, गावातील सरपंच, उपसरपंच हे उपस्थीत होते. गिरोला गावांची संख्या अंदाजे 700 आहे. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष प्रमुख पाहुणे मार्गदर्शकांनी दिशा योजनेला अनुसरुन आपआपल्या क्षेत्रातील कायदयांशी निगडीत कायदेविष्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थीत 95 लोकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वॉकेथॉनचे आयोजन

Mon Jan 16 , 2023
गडचिरोली : राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ दिनांक ११-०१-२०२३ ते १७-०१-२०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज दिनांक १६-०१-२०२३ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांनी वॉकेथॉनचे आयोजन केलेले होते. सदर वॉकेथॉन आय.टी.आय. ते कोर्ट चौक वरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सांगता करण्यात आली. त्यानंतर सर्वांना रस्ता सुरक्षेपर शपथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com