ऑरेंज सिटी पार्क टाऊनशीप मध्ये घरफोडी,2 लक्ष 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी पार्क टाऊनशीप मधील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने 2 लक्ष 32 हजार 500 रुपयांची घरफोडी केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी धर्मेंद्र चंद्रिकापुरे वय 42 वर्षे रा फ्लॅट नं ए 3 तळमजला ,ऑरेंज सिटी पार्क कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे लग्न सोहळ्या निमित्त 26 मे ला घराला कुलुपबंद करून परिवारासह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून घराचा मुख्य दरवाजा फोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील बेडरूम मध्ये असलेला लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यात सुरक्षित ठेवलेले नगदी 37 हजार 500 व 10 ग्राम वजनी चा एक सोन्याचा हार किमती 50 हजार रुपये,10 ग्राम वजनी चा एक सोन्याचा मंगळसूत्र किमती 50 हजार रुपये,8 ग्राम वजनी चा एक सोन्याचा गोफ किमती 40 हजार रुपये,4 ग्राम वजनी ची एक सोन्याची गाठी किमती 20 हजार रुपये,7 ग्राम वजनी च्या दोन सोन्याच्या अंगठ्या किमती 35 हजार रुपये असा एकूण 39 ग्राम सोन्याचे दागिने किमती 1 लक्ष 95 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना आज सकाळी फिर्यादी परिवारासह घरी आले असता निदर्शनास आले .पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सोनेगाव स्थित कटारिया ऍग्रो कम्पनी पुन्हा आगीच्या विळख्यात, 4 कामगार जखमी?

Mon May 29 , 2023
वाडी :- सोनेगाव निपाणी ग्रा.प हद्दीत असलेली कटारिया ऍग्रो बायोमास प्रॉडक्ट्स कंपनी काल शनिवारी रात्री पुन्हा एकदा आगीच्या विळख्यात सापडल्याने परिसरात खळबळ व चिंता दिसून आली. वाडी नप चे अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे व सोनेगाव ग्रा.प चे जागरूक सदस्य विनोद लंगोटे यांनी या संदर्भात प्राथमिक माहिती देताना सांगितले की निशांत भारत कटारिया यांच्या मालकीच्या कटारिया ऍग्रो नामक कँपणीत रात्री 11 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com