काटोल :- दि. २२/०३/२०२४ रोजी सकाळी ०६/०० वा. पोलीस स्टेशन काटोल येथील पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम सोबत, सहायक पोलीस निरीक्षक नागवे, पोलीस हवालदार लखन महाजन, पोलीस नाईक प्रवीण पवार, रणजीत रोकडे, विकास वाईकर, गुलाब भालसागर, रमेश काकड, वसंता नागरे, अस्मिता गायकवाड, सविता आहाके, असा पोलीस ठाणे काटोल येथील पोलीस स्टाफ सोबत घेऊन पोलीस ठाणे काटोल अंतर्गत येणाऱ्या मौजा डोंगरगाव पारधी वेडा येथे दारू बावत रेड केली असता अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण १० इसम हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले, आरोपीचे ताब्यातून ४८०० लिटर मोहाफुल रसायन सडवा व १७० लिटर मोहाफुल गावठी दारू एकूण किंमती १,१६,५००/- रुपयाचा अवैधरित्या मुद्देमाल मिळून आल्याने ०७ महिला व ३ पुरूष नामे १) नितेश रवी पवार, रा. घुबडमेट २) दिनेश तेजराम मारवाडी रा. डोंगरगाव काटोल ३) साहिल माने सोलंकी रा. डोंगरगाव काटोल असे एकुण १० इसमांविरूद्ध पो.स्टे काटोल येथे वेगवेगळे कलम ६५, ई म.दा.का. महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम सोवत, सहायक पोलीस निरीक्षक नागवे, पोलीस हवालदार लखन महाजन, पोलीस नाईक प्रवीण पवार, रणजीत रोकडे, विकास वाईकर, गुलाब भालसागर, रमेश काकड, वसंता नागरे, अस्मिता गायकवाड, सविता आहाके यांचे सह कार्यवाही करण्यात आली आहे.
पो.स्टे काटोल हद्दीतील अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com