कळमेश्वर :- दि. २२/१०/२०२४ रोजीपो, स्टे. कळमेश्वर हद्दीत पारधी बेडा गोंडखैरी येथे अवैधरित्या गावठी पद्धतीने भट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु गाळणारे एकुण ०७ महिला आरोपी हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपींचे ताब्यातून १) ७०२० लिटर मोहाफूल गावठी दारू कि ७०२०००/-रू. २) ३९०० लिटर मोहाफूल सडवा रसायन कि.१३६५००/-रू. ३) मोहाफूल गावठी दारू गाळण्याचे इतर साहित्य कि. १९८००/- रु ४) १५०० लिटर मोहाफूल रसायन भरलेले किंमती ५२५००/- रू. असा एकुण कि. ९१०८००/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.
महिला आरोपींविरुद्ध पो.स्टे कळमेश्वर येथे कलम ६५ (सी), (ई), (व) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनातपोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोनि मनोज काळबांडे, सपोनि सविता वड्डे व इतर स्टाफ यांनी पार पाडली.