राज्यातल्या येऊ घातलेल्या लोकसभा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा त्यावर मी येथे तुम्हाला खूप काही सांगणार आहे, कान देऊन ऐका संबंधितांनी हे वाचून कामाला लागा. वर्ल्ड कप दरम्यान सेमी फायनल सहित इतर साऱ्याच मॅचेस आपण जिंकलो पण फायनलला दणकून पराभूत झालो आणि हा पराभव जसा आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रत्येक भारतीयांच्या जिव्हारी बसला तसे येणाऱ्या निवडणुकीत जर राज्यातल्या महायुतीचे झाले तर एका दमात अनेकांचे राजकीय करिअर कायमस्वरूपी उध्वस्त होईल हे ध्यानात घेऊन ठेवून राज्यातल्या सध्याच्या कमकुवत भरकटलेल्या कमजोर महाआघाडीला विरोधकांना अजिबात कमी न लेखता महायुतीने तातडीने आजवरच्या चुकांवर पांघरूण घालत लगेचच तयारीला लागावे म्हणे नेमके त्यांनी काय करावे तेही येथे मला सांगायचे आहे. आई वडील नोकरी निमित्ताने दररोज बाहेर पडणाऱ्या त्यांच्या मुलाला माझ्या मित्राला न चुकता शेजारचा तरुण चॉकलेट आणायचा आणि काही क्षण त्याच्या सोबत घालवायचा, मला तो खेळवायला येतो, जेव्हा माझा हा मित्र म्हणाला तेव्हा मी त्याला म्हणालो कि त्याचे चॉकलेट खाणे आणि त्याच्याशी काही क्षण खेळणे ताबडतोब बंद कर कारण तो तुला खेळवायला येत नाही तर तो तुला सांभाळणार्या शेवंताला लोळवायला येतो, भाजपाने अलीकडे जिंकलेल्या इतर तीन राज्यातल्या जिंकलेल्या निवडणुकांचे हे असेच आहे, त्यांच्या चॉकलेटच्या भरवंशावर जर महाराष्ट्रातली महायुती जिंकणारच आहोत असे मनोरथ रचत असेल तर शेजारच्या घरात पाळणा हलल्यानंतर जणू आपल्याला पोर झाले आहे असा आनंद व्यक्त कारण्यासारखे हे ठरावे…
थोडेसे विषयांतर, सुनेत्रा पवारांचे बारामती पासून तर मुंबई पर्यंत भावी खासदार या उल्लेखाचे अनेक ठिकाणी होर्डिंग्स अचानक लागले आणि एकच खळबळ माजली, लोकांची उत्सुकता वाढली, शरद पवारांसहित त्यांच्या राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली, सुप्रिया सुळे यांची भंबेरी उडाली कारण सुनेत्रा पवार लोकसभा आपल्या विरोधात लढविण्याची मोठी तयारी करताहेत हे सुप्रिया यांना काही महिन्यांपूर्वीच कळले होते, चाणाक्ष शरद पवारांच्या ते लक्षात आले होते पण अजित पवारांजवळ हा विषय काढण्याची संधी बाप लेकीला सापडत नव्हती ती तशी संधी नेमकी दिवाळी भाऊबीज दरम्यान सुप्रियाला चालून आली, कृष्णाच्या चतुर भूमिकेत कायम वावरणार्या शरद पवारांनी, विषय काढ, असे खुणावून सांगितले आणि सुप्रिया यांनी नवा डाव नवा प्रस्ताव अजितदादांसमोर टाकला, दादा, बहिणीच्या अब्रूची लक्तरे तेही थेट बारामतीच्या वेशीवर टांगू नका, मी अपक्ष म्हणून खासदारकी लढवते तुम्ही सुनेत्रा वहिनींना खासदारकी लढविण्या उतरवू नका, नेमके शरदरावांच्याच तालमीत तयार झालेले अजित पवार त्याक्षणी गालातल्या गालात केवळ छद्मी हसले, सुप्रिया तुम्हीच माझ्या बाजूने खासदारकी लढवा म्हणजे बारामती मधून मला इतरांच्या नावाचा विचार देखील येणार नाही, म्हणाले आणि बाहेर पडले, नेमके हेच उत्तर दिल्ली दरम्यानच्या भेटीत पार्थ पवारांनी आपल्या आत्याला दिले. सुप्रियाच्या टाकलेल्या डावाला त्यांच्या विनंतिला जर अजितदादा शब्द किंवा मान देऊन बसले असते तर भावी खासदार असे सुनेत्रा वहिनींचे होर्डिंग्स जागोजाग झळकले नसते…
पुढला भाग महत्वाचा, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे पवार हा राज्यातला सर्वाधिक जंगी मुकाबला उद्या लोकसभा निवडणुकीला बघायला मिळणार आहे त्यात सुनेत्रा वाहिनी विजयी होतील हे नक्की आहे आणि असे असले तरी मनातून अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी दोघेही खूप अस्वस्थ आहेत कमालीचे दुख्खी आहेत हिरमुसले आहेत अशांत आहेत असे का, तर दोघांचेही फार मोठे दुःख कॉमन आहे म्हणजे पवारांच्या घराण्यात तेही शरद पवार अस्वस्थ असतांना अशी हि फोडाफोडी म्हणून हे दाम्पत्य दुःखी कष्टी झालेले नाहीत तर जय किंवा पार्थ ऐवजी हि लोकसभा त्यांच्या आईला लढवावी लागते आहे हे ते दुःख आहे त्या दोघांच्या अस्वस्थतेचे मोठे कारण आहे कारण सुप्रिया विरोधात पार्थ अथवा जय, कितीही मोठा प्रचार किंवा प्रसार केला तरी सुप्रिया त्यातून अगदी सहज बाजी मायून नेतील हे अजितदादांना नेमके आणि नक्की माहित असल्याने उतरत्या वयात कधी नव्हे ते राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवारांना उतरविणे दादांना भाग पडले आहे. अजित दादांच्या पुढल्या पिढीला अद्याप राज्याच्या राजकारणात मार्ग न गवसणे त्यापेक्षा मोठे दुःख असूच शकत नाही….
स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून या स्वभावाच्या अजित पवारांना शेवटी मुलांना झाकून ठेवून पत्नीला निवडणुकीच्या जाहीर आखाड्यात उतरवावे लागते आहे, एक मात्र अनुत्तरित कि काकांना संपविण्याचा आनंद अजित पवारांना झालेला असेल कि पार्थ जय ऐवजी पत्नीला पुढे करण्याचे दुःख त्यांना अधिक बोचत असेल त्यातच नेमके अजित पवार राजकीय आखाड्यात जिंकून देखील व्यक्तिगत आयुष्यात मात्र केवळ तरुणपणीच्या मस्तीतून सत्तेच्या धुंदीतून आणि पैसे कमविण्याच्या नादातून आज परभूत झाल्यासारखे नक्की वाटत राहतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, हि म्हण सत्तेच्या मस्तीत बेधुंद झालेल्या असलेल्या विशेषतः समस्त नेत्यांनी आणि हे राज्य सतत लुटणार्या समस्त सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दलालांनी आणि हुजरेगिरी करणाऱ्या बहुसंख्य मीडियातल्या नालायक मीडिया मंडळींनी पाठ करून लगेचच वाल्मिकीच्या भूमिकेत शिरावे….
शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा, महायुतीला जर राज्यातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील आणि देशव्यापी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांना त्यानंतर लगेचच एस्टॅब्लिश व्हावयाचे असेल किंवा एकनाथ शिंदे यांना देखील जर आपले नेतृत्व एका विशीष्ट उंचीवर नेऊन सोडायचे असेल तर शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ त्या शिवराज चौहान यांचे हुबेहूब अनुकरण करावे या दोघांना स्त्रियांच्या बाबतीत सुदैवाने उत्तम चरित्र असलेली एक इमेज आहे त्यांनी ती तशी जोपासली आहे म्हणून शिवराज पद्धतीने, आमचा लाडका दादा आमचा लाडका मोठा भाऊ हे वाक्य राज्यातल्या घराघरात बिंबवून सोडावे अर्थात त्यासाठी पुढल्या काही दिवसात राज्यातल्या भगिनी आश्वस्त होतील निश्चिन्त होतील असे निर्णय तातडीने घेऊन मोकळे व्हावे, आमचा विश्वासू आमचा लाडका भाऊ आमचा पाठीराखा अशी इमेज आजतागायत एकही नेत्याने या राज्यात जोपासलेली नाही म्हणून हि मोठी संधी शिंदे फडणवीसांना चालून आलेली आहे ज्यावर तातडीने महत्वाचे निर्णय घेणे त्यांना अत्यावश्यक आहे कारण जर घरातली स्त्री एखाद्या नेत्याच्या पाठीशी असेल तर काय कोणता चमत्कार घडतो हे शिवराज यांनी सिद्ध केलेले आहे. तातडीने मंत्री मंडळ विस्तार करून महिला आमदारांना मोठ्या प्रमाणात सामावून घ्या, सुरुवात तर करा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी